Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या ज्ञानाने त्या शहराचा बचाव केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब मनुष्यास विसरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्या शहरात एक गरीब पण सुज्ञ मनुष्य होता, आणि आपल्या सुज्ञानाने त्याने शहर वाचविले. पण त्या गरीब माणसाची कोणी आठवण केली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 9:15
8 Iomraidhean Croise  

तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला.


मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली. तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजवले आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेर्‍यांकडे गेले. आणि यवाब यरुशलेमेस राजाकडे परत गेला.


सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.


मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सदा राहणार नाही, कारण पुढे येणार्‍या दिवसांत सर्वांचे विस्मरण होणार आहे. तर पाहा, ज्ञानी कसा मरण पावतो तर मूर्खाप्रमाणेच!


अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा.


नगरातल्या दहा अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते.


त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्‍यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan