Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही; मरणदिवस कोणाच्या स्वाधीन नाही; हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जीवनाच्या श्वासास थांबून धरण्याचा अधिकार कोणालाही नाही; आणि कोणालाही त्याच्या मरणाच्या दिवसावर अधिकार नाही. युध्द चालू असताना कोणाचीही सैन्यातून सुटका होत नाही, आणि दुष्टाई त्याच्या दासास सोडवणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जसे कोणत्या मनुष्याला वार्‍यावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य नाही, तसेच त्यांच्या मृत्यूच्या वेळेवरही कोणाला अधिकार नाही. जसे कोणालाही युद्धाच्या वेळी सुट्टी नसते, तसेच दुष्टता करणाऱ्यांना ती त्यातून सुटका देत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 8:8
21 Iomraidhean Croise  

आपल्या सर्वांना मरणे प्राप्त आहे; आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही; देव प्राणहरण करत नसतो तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करत असतो.


ते यार्देनेपर्यंत त्यांच्यामागून गेले आणि पाहतात तर अरामी लोकांनी आपली वस्त्रेपात्रे गडबडीत रस्ताभर टाकून दिलेली त्यांना आढळली. जासुदांनी परत जाऊन राजाला हे सांगितले.


मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे; त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे; तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहेस, ती त्याला ओलांडता येत नाही;


त्याचे चित्त स्वतःकडेच असले, त्याने आपला आत्मा व श्वास आवरून स्वत:च्या ठायी परत घेतला,


असा कोण मनुष्य आहे की, तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कबजातून आपला जीव कोण सोडवील? (सेला)


देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील.


मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही.


विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.


मानवपुत्राचा प्राण वर जातो आणि पशूचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक?


पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही.


कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल; अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही; संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल.


कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस; तू म्हणालीस, “कोणी मला पाहत नाही;” तुझे शहाणपण व तुझे ज्ञान ह्यांनी तुला बहकवले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही.”


जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते;


कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्याबाबत जिवंत असे राहू.


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan