Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जेव्हा वाईट गुन्ह्याबद्दल शिक्षेचा हुकूम होऊनही ती लवकर अंमलात आणली जात नाही. त्यामुळे मानवजातीचे मन वाईट करण्याकडे तत्पर असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जर एखाद्या अपराधासाठी त्वरित शिक्षा करण्यात आली नाही, तर लोकांचे हृदय चुकीचे कार्य करण्याच्या योजनेने भरतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 8:11
19 Iomraidhean Croise  

त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाला ठेवा; आणि त्याला तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्याला मार लागून तो मरेल.”


तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.


दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.


तो आपल्या मनात म्हणतो की, “मी ढळणार नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडणार नाही.”


तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.


परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,


ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.


तथापि फारोने ह्या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकांना जाऊ दिले नाही.


भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात.


दुर्जनांवर कृपा केली तरी तो नीती शिकायचा नाही; सरळांच्या राज्यातदेखील तो अधर्म करील; परमेश्वराचे ऐश्वर्य त्याला दिसायचे नाही.


कोणाला घाबरून, कोणाला भिऊन तू लबाडी केलीस, माझे स्मरण ठेवले नाहीस, परिणामांची पर्वा केली नाहीस? मी दीर्घ काळ स्तब्ध राहिलो, म्हणूनच का तू माझे भय धरले नाहीस?


तर अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मिसर देशात जाऊन तेथे काही दिवस राहण्याचा तुमचा निश्‍चय असला तर


मवाब लहानपणापासून सुखात आहे. स्थिर राहिल्यामुळे गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखा तो आहे; त्याला ह्या पात्रातून त्या पात्रात ओतले नाही, तो बंदिवान होऊन गेला नाही, म्हणून त्याची रुची तशीच कायम आहे; त्याच्या वासात काही फरक झालेला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan