Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे कोणाला समजते? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करते; तेणेकरून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ज्ञानी मनुष्य कोण आहे? जीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजते? मनुष्यातील ज्ञान त्याचे मुख प्रकाशीत करते आणि त्याच्या मुखाचा कठीणपणा बदलतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सुज्ञासारखा कोण आहे? गोष्टींचे स्पष्टीकरण कोणाला माहीत आहे? मनुष्यांचे सुज्ञान त्यांचे मुख उजळून टाकते आणि त्यांचे कठोर स्वरूप बदलते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 8:1
27 Iomraidhean Croise  

ते त्याला म्हणाले, “आम्हांला स्वप्ने पडली आहेत व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपापले स्वप्न मला सांगा.”


मनुष्याला सन्मार्ग दाखवणारा हजारांत एक असा कोणी मध्यस्थ दिव्यदूत त्याला आढळला,


इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहर्‍यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे.


बोधवचने व दृष्टान्त, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत; ह्यासाठी ही आहेत.


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटांकडे असतात.


दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो.


सुज्ञ पुरुष बलवान असतो; ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करतो.


तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो.


राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”


तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.


तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.


तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;


तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.


म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे.


माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.


त्या लोकांची मुद्रा क्रूर असेल, ते वृद्धांचा आदर करणार नाहीत की बालकांवर दया करणार नाहीत.


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan