Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस, क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:9
24 Iomraidhean Croise  

मग काइनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले; आणि असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले.


अबशालोम अम्मोनास बरेवाईट काही बोलला नाही; अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरले.


अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की, “सावध राहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हांला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा, काही भिऊ नका; मी तुम्हांला हुकूम करतो आहे ना? हिंमत धरा, शौर्य दाखवा.”


तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा ह्याचा पुत्र योनादाब म्हणाला, “माझे स्वामी, सर्व राजपुत्र मरण पावले अशी कल्पना महाराजांनी मनात आणू नये; केवळ अम्नोनाचा वध झाला आहे; कारण ज्या दिवशी त्याने अबशालोमाची बहीण तामार भ्रष्ट केली त्या दिवशी त्याच्या संकल्पाने ही गोष्ट निश्‍चित झाली होती.


इस्राएल लोक यहूद्यांना म्हणाले, “महाराज दहा हिश्शांनी आमचे आहेत; तुमच्याहून आमचा दाविदावर जास्त हक्क आहे; तर तुम्ही आम्हांला तुच्छ समजून आमच्या महाराजांना माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला का घेतला नाही?” इस्राएल लोकांच्या भाषणापेक्षा यहूदी लोकांचे भाषण कठोरपणाचे होते.


शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्‍याचा लोक द्वेष करतात.


ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो.


ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय.


फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्‍याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.


“ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.


तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.”


मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”


तेव्हा देव योनाला म्हणाला, “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.”


ह्याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना;


तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शीर!”


माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan