Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली, परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:29
20 Iomraidhean Croise  

आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;


त्यांनी आपल्या कृत्यांनी त्याला क्रोध आणला म्हणून त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली.


ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले; ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले.


हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस; तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास.


ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे कोणाला समजते? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करते; तेणेकरून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो.


“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”


तुला निर्माण केले त्या दिवसापासून तुझ्या ठायी अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan