Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ज्ञान व विवेक ही समजून घेऊन त्यांचे रहस्य जाणावे व त्यांचा शोध लावावा, आणि दुष्टता केवळ मूर्खत्व आहे व मूर्खत्व केवळ वेडगळपणा आहे, हे समजावे म्हणून मी फिरून आपले चित्त ह्या गोष्टींकडे लावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले. आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले, आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी आणि दुष्टतेची मूर्खता व मूर्खतेचा वेडेपणा समजण्यासाठी मी माझे मन वळविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:25
17 Iomraidhean Croise  

ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले; शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्राएलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मनस्वी दु:ख होऊन ते फार संतापले.


ती म्हणाली, “माझ्या बंधो, छे, माझ्यावर बलात्कार करू नकोस, इस्राएलात असे कुकर्म करू नये; असला मूर्खपणा तू करू नकोस.


जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो.


जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्‍या कुत्र्यासारखा होय.


त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो.


मग पाहा, ज्ञान, वेडेपण व मूर्खपण ह्यांकडे मी लक्ष पुरवले; कारण राजाच्या मागून येणार्‍या पुरुषाच्या हातून काय होणार? आजवर लोक जे करीत आले तेच तो करणार.


मग मी आपल्या मनात म्हटले, “मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला?” मी आपल्या मनात म्हटले हेही व्यर्थच!


ह्यास्तव ह्या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले; आणि माझे मन हताश झाले.


उपदेशक1 म्हणतो, हिशोब पाहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले ते हे :


तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग : उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan