Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मी ह्या सर्व गोष्टी विवेकाने अजमावून पाहिल्या आहेत; “आपण ज्ञानसंपन्न व्हावे,” असे मी म्हणालो, पण ते माझ्यापासून दूरच राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो, मी ज्ञानी होईन, परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले, “मी सुज्ञानी होण्याचे ठरविले आहे”— परंतु हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:23
9 Iomraidhean Croise  

कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”


ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले, तेव्हा मला असे दिसून आले की, हाही वायफळ उद्योग होय.


आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.


कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे.


मग मी देवाच्या सर्व कार्याकडे लक्ष दिले, तेव्हा असे दिसून आले की भूतलावर जे काही कार्य चालले आहे ते मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागायचा नाही.


स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले;


‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?


Lean sinn:

Sanasan


Sanasan