Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा, शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे, जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे. म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी; मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:2
29 Iomraidhean Croise  

ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.


ज्ञान्याचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात; आणि मूर्ख अंधकारात चालतो; असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले.


मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सदा राहणार नाही, कारण पुढे येणार्‍या दिवसांत सर्वांचे विस्मरण होणार आहे. तर पाहा, ज्ञानी कसा मरण पावतो तर मूर्खाप्रमाणेच!


मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूंवर येतात; दोघांवरही एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोही मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्वकाही व्यर्थ आहे!


सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात.


हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना?


जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्‍याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्‍याची सारखीच दशा होते.


भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात.


आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.


तू म्हणालीस, “मी सर्वकाळ स्वामिनी राहीन,” म्हणून तू ह्या गोष्टी ध्यानात धरल्या नाहीत, त्यांचा परिणाम लक्षात आणला नाही.


ज्या घरात मेजवानी असेल त्यात जाऊ नकोस, त्यांच्याबरोबर खाण्यापिण्यास बसू नकोस.


आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन; तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे.


याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”


‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’


ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!


मग तो त्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी आज मी तुम्हांला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan