Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 दुष्टतेचा अतिरेक करू नकोस; मूर्ख होऊ नकोस; तू अकाली का मरावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका, तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अति दुष्ट होऊ नका, आणि मूर्खही असू नका— तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:17
15 Iomraidhean Croise  

आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


ते अकाली उच्छेद पावले, त्यांच्या पायाखालच्या भूमीचे विरघळून पाणी झाले;


हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.


परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात.


आणखी माझ्यापासून तुला पुत्र व कन्या ही झालीं, ती तू घेऊन त्यांना खाऊन टाकण्यासाठी बळी म्हणून अर्पण केलीस. ह्या तुझ्या शिंदळक्या तुला पुरेशा झाल्या नाहीत;


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? यहूदाचे घराणे येथे ही अमंगळ कृत्ये करत आहे, हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यांनी भरून ते मला पुनःपुन्हा संतापवतात; पाहा, ते आपल्या नाकास डाहळी लावत आहेत.


त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.


इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.”


तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले.


हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले.


म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवांचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.


नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यू पावला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan