Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे. या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा; परंतु जेव्हा वेळ प्रतिकूल असते, तेव्हा हे लक्षात घ्या: परमेश्वराने जशी अनुकूल वेळ निर्माण केली तशी प्रतिकूल वेळही त्यांनीच निर्माण केली, म्हणून कोणा व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेता येत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:14
35 Iomraidhean Croise  

तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्‍या लोकांच्या देशांत तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’;


तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.


मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.


त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील.


मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?


हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.


आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.


व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक3 म्हणतो, सर्वकाही व्यर्थ!


ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, ह्यापरते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे; त्याच्यामागे जे काही होणार ते त्याने पाहावे म्हणून त्याला परत कोण आणील?


रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो;


तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.


पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल?


जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.


परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप मागे फिरणार नाही; पुढील काळात तुम्हांला हे चांगले समजेल.


अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय?


परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्‍याचे ऐका.


‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.”


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर; तुझ्याबरोबरचा लेवी व तुझ्याबरोबरचा उपरा ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा.


कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही,


मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले; तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.


मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो, तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव.


तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan