Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 देवाची करणी पाहा; त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 देवाच्या कृत्यांचा विचार कराः जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परमेश्वराच्या कामावर मनन करा: त्यांनी जे वाकडे केले आहे ते कोण सरळ करू शकतो?

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:13
19 Iomraidhean Croise  

भ्रमण करीत असता त्याने एखाद्याला पकडून अटकेत टाकले, आणि न्यायसभा भरवली, तर त्याचा हात कोण धरील?


पाहा, तो जे मोडतो ते पुन्हा उभारता येत नाही; त्याने एखाद्याला बंधनात ठेवले तर त्याला कोणाच्याने खुले करवत नाही.


त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


ईयोबा, कान देऊन हे ऐक; स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर.


तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? ‘तू हे काय करतोस,’ असे त्याला कोण म्हणणार?


आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर ―


जे वाकडे आहे ते सरळ होत नाही; जे उणे आहे ते जमेस धरता येत नाही.


आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.


मग मी देवाच्या सर्व कार्याकडे लक्ष दिले, तेव्हा असे दिसून आले की भूतलावर जे काही कार्य चालले आहे ते मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागायचा नाही.


सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल! त्याचा हात उगारलेला आहे तर तो कोणाच्याने मागे आणवेल?


“येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”


वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी; पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता?


कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”


ह्यावर तू मला म्हणशील, तर मग तो अजून दोष का लावत असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे?


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan