Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे, आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 7:1
23 Iomraidhean Croise  

तेथे दुर्जन त्रास देण्याचे थांबवतात, श्रांत विश्रांती पावतात.


ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे;


नेत्रांचे तेज अंत:करणाला उल्लास देते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.


चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.


फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील.


तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणार्‍या मित्राचे माधुर्य होय.


गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.


म्हणून जे अद्यापि हयात आहेत त्यांच्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी असे मी म्हटले.


एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा.


तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुझ्यावर प्रेम करतात.


अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे!


त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.


तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.”


तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.”


शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता.


कारण आम्हांला ठाऊक आहे की, आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे; ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे.


आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते.


विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती.


ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही;


तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “लिही : प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.”


ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली, आणि मनुष्य मनुष्याला ओळखता येण्यापूर्वी ती उठली; कारण बवाजने तिला सांगितले होते की, “खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan