Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तो मनुष्य कदाचित दोन हजार वर्षे जरी जगला. पण तो चांगल्या गोष्टींचा उपभोग घेण्यास शिकला नाही तर प्रत्येकजण ज्या जागी जातात त्याच जागी तो पण जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जरी तो हजार किंवा दोन हजार वर्षे जगला व त्याला संपत्तीसुखाचा आनंद लाभला नाही. सर्वजण एकाच ठिकाणी जात नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 6:6
18 Iomraidhean Croise  

आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.


तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”


मला ठाऊक आहे की तू मला मृत्युवश करशील; सर्व जीवधारी ज्या स्थळी एकत्र होणार आहेत त्याप्रत मला पोचवशील.


माझा प्राण केवळ वायू आहे, माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसणार नाही, हे लक्षात आणा.


सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण?


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


ज्ञान्याचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात; आणि मूर्ख अंधकारात चालतो; असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले.


सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात.


कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो.


त्याप्रमाणेच सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही; म्हणून ह्याला त्या दुसर्‍या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते.


भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील.


जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्‍याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्‍याची सारखीच दशा होते.


ह्यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुर्‍या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल.


ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.


तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश ह्यांत तो वस्ती करील.


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan