Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जर कोणा मनुष्याने शंभर मुलांस जन्म दिला आणि पुष्कळ वर्षे जगला आणि त्याच्या आयुष्याचे वर्षे पुष्कळ असली, परंतु त्याचा जीव चांगल्या सुखाने समाधान पावला नाही आणि त्यास सन्मानाने दफन केले नाही. तर त्याच्यापेक्षा मृत जन्मलेले बाळ खूप बरे आहे. असे मी म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 एखाद्या व्यक्तीला शंभर लेकरे असतील आणि तो दीर्घायुषी जगला; तरी तो आपल्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकत नसेल आणि त्याला योग्य रीतीने मूठमाती मिळत नाही, तर मी असे म्हणतो की, त्याच्यापेक्षा मृत जन्मलेला गर्भ बरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 6:3
23 Iomraidhean Croise  

एसावाने दृष्टी वर करून बायका व मुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याबरोबर हे कोण आहेत?” तो म्हणाला, “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले आहेत.”


याकोब फारोला म्हणाला, “माझी जीवितयात्रा एकशे तीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोचले नाहीत.”


अहाबाचे सत्तर पुत्रपौत्र शोमरोनात राहत असत. येहूने इज्रेल येथील वडील जनांपैकी जे अधिकारी होते त्यांना आणि अहाबाच्या पुत्रांचे पालन करणे ज्यांच्याकडे होते त्यांना पत्रे लिहून शोमरोनास पाठवली; त्यांत असे म्हटले होते :


तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी, पाय व हाताचे तळवे ह्यांखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही.


परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.


रहबाम आपल्या सर्व पत्नी व उपपत्नी ह्यांच्यापेक्षा अबशालोमाची कन्या माका हिच्यावर अधिक प्रीती करीत असे; त्याने अठरा पत्नी व सात उपपत्नी केल्या व त्याला अठ्ठावीस पुत्र व साठ कन्या झाल्या.


आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले.


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला?


अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा, प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखा मी असतो.


सरपटताना विरघळत जाणार्‍या गोगलगाईसारखे, ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत.


पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत;


जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी.


कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो; त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते.


गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल; त्याचे शव यरुशलेमेच्या वेशींबाहेर ओढत नेऊन फेकून देतील.”


“ह्यास्तव यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, दाविदाच्या आसनावर बसण्यास कोणी राहणार नाही व त्याचे शव फेकण्यात येईल, ते दिवसाच्या उन्हात व रात्रीच्या हिवात पडून राहील.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan