Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ते हे : कोणा मनुष्याला देव धन, संपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला पाहिजे ते मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही; तरी देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगतो; हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 देव कोणा मनुष्यास खूप संपत्ती, धनदौलत आणि मानसन्मान एवढा देतो की तो मनुष्य जे इच्छितो ते सर्व त्यास मिळते, कसलीही उणीव पडत नाही. परंतु नंतर देव त्यास त्याचा आनंद घेण्याची शक्ती देत नाही. त्याऐवजी कोणीतरी अनोळखी त्या गोष्टींचा उपयोग करतो. हे व्यर्थ आहे, अतिशय वाईट पीडा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 6:2
24 Iomraidhean Croise  

एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखी एक वर तुला देतो; धन आणि वैभव हे तुला देतो; तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्यासमान कोणी असणार नाही.


परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलादेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याही राजाला पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजऐश्वर्य त्याला दिले.


आयुष्य, धन व मान ह्यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला; त्याचा पुत्र शलमोन त्याच्याजागी राजा झाला.


देव शलमोनाला म्हणाला, “ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाहीस, आपल्या वैर्‍यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाहीस, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वत:साठी मागितलेस,


हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;


खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.


मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात.


मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते; हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे;


तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ?


मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे : मनुष्याने खावे, प्यावे व ह्या भूतलावर जे श्रम तो करतो त्या सर्वांत देवाने त्याला दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे; कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे.


कोणा मनुष्याला देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल, तर ही देवाची देणगीच समजावी.


जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.


आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही; त्याचे केस मधूनमधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही.


तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या सार्‍या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील.


तुझ्याबरोबर राहणार्‍या उपर्‍याची तुझ्यापेक्षा अधिकाधिक उन्नती होत जाईल.


तेथे गेल्यावर निश्‍चिंत राहणारे लोक तुम्हांला आढळतील. तो देश विस्तीर्ण असून देवाने खरोखर तो तुमच्या हाती दिला आहे. ती जागाच अशी आहे की, तेथे जमिनीच्या कोणत्याही उत्पन्नाची कमतरता नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan