Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्‍चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो. त्यामध्ये त्यास काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? कारण त्याच्या मरणानंतर पृथ्वीवर काय होईल हे मनुष्यास कोण सांगेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 6:12
28 Iomraidhean Croise  

आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत; ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात; आमची काही शाश्वती नाही.


तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.


त्याच्या पुत्रांची उन्नती होते ती त्याला कळत नाही; त्यांची अवनती होते ती त्याला दिसत नाही.


(आपण तर कालचे, आपल्याला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत;)


माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत; गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे.


उतरत्या सावलीप्रमाणे मी चाललो आहे; मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.


मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे.


परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.


मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.


“आमचे कल्याण कोण करील?” असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड.


त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला)


माझे आयुष्य किती अल्प आहे ह्याची आठवण कर; तू सर्व मानवजात निर्माण केलीस ती व्यर्थच काय?


मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?


आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.


मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.


मानवपुत्रांनी आपल्या सार्‍या आयुष्यात ह्या भूतलावर2 काय केले असता त्यांचे हित होईल ह्याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल ह्याचा मी आपल्या मनाशी शोध केला.


ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, ह्यापरते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे; त्याच्यामागे जे काही होणार ते त्याने पाहावे म्हणून त्याला परत कोण आणील?


व्यर्थतेची वृद्धी करणार्‍या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ?


एखादा नीतिमान मनुष्य नीतीचे र्आचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो; आणि एखादा दुष्ट मनुष्य अनीतीचे आचरण करीत असताही दिर्घायू होतो; हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसांत पाहिले आहे.


पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही.


पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल?


त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.


देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे.


हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?


त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan