Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 बोलण्याची घाई करू नकोस; देवासमोर कोणताही उद्‍गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नकोस; कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुझ्या मुखाने बोलण्याची घाई करू नको, आणि देवासमोर कोणतीही गोष्ट उच्चारायला तुझे मन उतावळे करू नको. देव स्वर्गात आहे पण तू तर पृथ्वीवर आहेस. म्हणून तुझे शब्द मोजकेच असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 5:2
21 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;


मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.”


तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”


याकोबाने असा नवस केला की, “देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला अन्न व ल्यायला वस्त्र देईल,


हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल; आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन.”


आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो.


फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.


“हे पवित्र आहे,” असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे, हे मनुष्याने पाशात पडणे होय.


शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.


त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो.


काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रकट होते.


बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी होत; पण तू देवाचे भय धर.


कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.


बरीवाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली; आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टीसंबंधाने तो दोषी समजावा; मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणतीही असो.


तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.


ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.


तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”


कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.


इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की, “तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस,


Lean sinn:

Sanasan


Sanasan