Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांच्या सर्व दिवसांत ते अंधारात राहून अत्यंत निराशा, यातना आणि क्रोधासह अन्न खातात,

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 5:17
21 Iomraidhean Croise  

आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;


ती म्हणाली, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही; मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करीत आहे; मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन; ते आम्ही खाऊ आणि मग मरू.”


अहज्या हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला; त्याने जासुदांना अशी आज्ञा केली की, “तुम्ही जाऊन एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करा की मी ह्या दुखण्यातून बरा होईन काय?”


त्यांनी त्याला सांगितले, “एका मनुष्याने आम्हांला वाटेत गाठून सांगितले की, ‘ज्या राजाने तुम्हांला पाठवले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, परमेश्वर म्हणतो तू एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्‍न करायला माणसे पाठवली ती इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय? तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस, तू अवश्य मरशील.”’


तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.” तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्यापुढून चालता झाला.


कोणी सौख्याचा अनुभव न घेता जिवाच्या कष्टदशेत मरतो.


मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे; व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत.


तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो.


खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.


ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली.


माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही; मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही; कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे; ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले.


त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच!


मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.


संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत.


त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan