Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते; हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे, ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली: जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती,

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 5:13
29 Iomraidhean Croise  

त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले.


तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या1 आपल्या जावयांना म्हणाला, “उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे;” परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले.


पण लोटाची बायको त्याच्यामागून चालली होती ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली.


त्याच्या मनाला तृप्ती म्हणून कधी वाटली नाही, म्हणून त्याला आपल्या कोणत्याही इष्ट वस्तुनिशी निभावून जाता येणार नाही.


धनाचा लोभ धरणार्‍या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.


कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते;


क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते.


धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव.


कारण संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय?


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


त्याचे ते धन एखाद्या अनिष्ट प्रसंगामुळे विलयास जाते; आणि त्याला पुत्र झाला असता त्याच्या हाती काही येत नाही.


हे सर्व मी पाहिले आहे; भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्यांकडे मी आपले चित्त लावले आहे; एक मनुष्य दुसर्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.


मनुष्यांनी पुजण्यासाठी केलेल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्र्या व वटवाघळे ह्यांच्यापुढे टाकून देतील.


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan