Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेथे अशाप्रकारचा कोणी मनुष्य आहे, तो एकटाच असून त्यास दुसरा कोणी नाही. त्यास मुलगा किंवा भाऊ नाही. परंतु तेथे त्याच्या कष्टाला अंत नाही. मिळकतीच्या धनाने त्याच्या नेत्राचे समाधान होत नाही. तो स्वतःशीच विचार करून म्हणतो, मी इतके कष्ट कोणासाठी करीत आहे? आणि माझ्या जिवाचे सुख हिरावून घेत आहे? हेही व्यर्थ आहे, वाईट कष्टमय आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 एक एकटाच मनुष्य होता; त्याला ना मुलगा होता ना भाऊ. त्याच्या श्रमाला अंत नव्हता, तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती. तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,” “आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?” हे सुद्धा व्यर्थ आहे— ही दैन्यावस्था आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 4:8
21 Iomraidhean Croise  

मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”


खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.


तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे.


अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.


ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत.


सर्वकाही कष्टमय आहे; कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही; ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही.


कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई ह्यांनी परिश्रम करून काही संपादावे, आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे; हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय.


त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच!


मग मी पुन्हा भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या :


ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही; हेही व्यर्थ!


शेतात मन घालणारा राजा देशाच्या कल्याणास सर्वस्वी कारण होतो.


जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात, जागा मुळीच उरू देत नाहीत, त्यांना धिक्कार असो; तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे.


जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.


अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’


कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan