Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय; युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांती करण्याचीही वेळ असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ; युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 3:8
19 Iomraidhean Croise  

पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.


योरामाने येहूला पाहिले तेव्हा तो म्हणाला, “येहू, सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे ह्यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?”


तेव्हा हनानी द्रष्ट्याचा पुत्र येहू हा यहोशाफाट राजाला सामोरा जाऊन म्हणाला, “तू दुष्टांचे साहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यावर प्रीती करावी काय? ह्यामुळे परमेश्वराचा तुझ्यावर कोप भडकला आहे.


मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही.


आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले.


तुझा द्वेष करणार्‍यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणार्‍यांचा मला वीट का येऊ नये?


नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो.


मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.


“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.


हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.


पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले,


त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवर्‍यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे;


परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएलाला त्याच्या वंशांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून वाटून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.


‘तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan