Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय; मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. शांत बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ; मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ;

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 3:7
32 Iomraidhean Croise  

रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.


तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.


मग यहूदा जवळ जाऊन म्हणाला, “स्वामी, कृपा करून आपल्या दासाला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची परवानगी मिळावी; आपला राग आपल्या दासावर भडकू नये; आपण तर फारोसमान आहात.


कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.”


हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याच्याबरोबर होते त्यांनीही तसेच केले.


मग दावीद यवाबाला व आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना म्हणाला, “आपली वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरापुढे शोक करत चाला.” दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला.


एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.


लोक गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण “तुम्ही त्याला उत्तर देऊ नका” अशी राजाची त्यांना ताकीद होती.


हे पत्र वाचून इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली; तो म्हणाला, “ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे; मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? विचार करा; पाहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे.”


त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तेव्हा त्याने आतून आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळले आहे असे त्यांना दिसले.


माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्‍याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”


ते सात दिवस व सात रात्री त्याच्याबरोबर जमिनीवर बसले; त्याचे दु:ख फार भारी आहे असे पाहून कोणी त्याच्याशी एकही शब्द बोलला नाही.


मौन धरून मी गप्प राहिलो, बरेदेखील काही बोललो नाही, तरी माझ्या दु:खाने उचल खाल्ली.


शोधण्याचा समय व गमावण्याचा समय; राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो;


ह्यावर ते गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण ‘तुम्ही त्याला उत्तर देऊ नये’ अशी राजाची त्यांना ताकीद होती.


राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली, तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत, कोणी आपली वस्त्रे फाडली नाहीत.


आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.


त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे.


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


ह्यास्तव जो शहाणा असेल तो अशा वेळी मौन धरील; कारण दिवस वाईट आहेत.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी मंदिरांतील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांच्या राशी पडतील; सर्व ठिकाणी ती मुकाट्याने बाहेर फेकतील.


सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्‍या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर.


कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.”


तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली.


शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली आहेत असे त्याने आम्हांला कळवले.” शमुवेलाने राजपदाविषयी जे काही कळवले होते त्यासंबंधाने त्याने त्याला काहीएक सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan