Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते. शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे; शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 3:4
23 Iomraidhean Croise  

सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल.”


परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.


तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस;


त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्‍हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.


मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या.


धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय; आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो;


संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत.


सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो.


यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.


‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत,’ त्यांच्यासारखी ही पिढी आहे.


येशू त्यांना म्हणाला, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील.


प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले.


आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.


कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.


कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan