Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 3:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, ह्यापरते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे; त्याच्यामागे जे काही होणार ते त्याने पाहावे म्हणून त्याला परत कोण आणील?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग मी पाहिले की, मनुष्याने आपल्या कामात आनंद करावा यापेक्षा काही उत्तम नाही. कारण हा त्याचा वाटा आहे. कारण तो मरून गेल्यावर जे काही होईल ते पाहायला त्यास कोण परत आणील?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मी हे पहिले की मानवांनी स्वतःच्या कामात आनंद मानावा, यापेक्षा त्यांच्यासाठी अधिक काही चांगले नाही, कारण हेच विधिलिखित आहे. ते गेल्यानंतर काय घडेल ते पाहण्यासाठी त्यांना कोण परत आणणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 3:22
24 Iomraidhean Croise  

त्याच्या पुत्रांची उन्नती होते ती त्याला कळत नाही; त्यांची अवनती होते ती त्याला दिसत नाही.


मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?


हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.


माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्यामागून येणार्‍याला ठेवून मला जावे लागणार आहे, हे लक्षात येऊन मी ह्या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला.


मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.


मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्‍चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?


संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत.


मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.


पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल?


कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.


तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.


ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.


पण तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा; तू आपला मुलगा व मुलगी, आपले दास व दासी व आपल्या वेशीच्या आत असलेला लेवी ह्यांच्याबरोबर ती खा; आणि जे जे काम तू हाती घेशील त्या सर्वांबद्दल तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा.


कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही,


Lean sinn:

Sanasan


Sanasan