Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 सर्व काही एकाच स्थानी जातात. सर्वकाही मातीपासून आले आहेत आणि सर्वकाही पुन्हा मातीस जाऊन मिळतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 सर्वकाही एकाच ठिकाणी जाणार आहेत; सर्व मातीतून येतात आणि पुन्हा मातीत जाऊन मिळतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 3:20
20 Iomraidhean Croise  

इश्माएलच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.


अब्राहाम पुर्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.


तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”


पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो; मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे असतो?


मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन.


जर अधोलोक माझे निजधाम आहे, एवढीच मला आशा आहे. जर मी आपली शय्या अंधकारात केली आहे,


तरी कोणी कोसळत असता आपला हात पुढे करीत नाही काय? आपला नाश होऊ लागला असता तो धावा करीत नाही काय?


तर सर्व जीवधार्‍यांचा एकदम प्राणान्त होईल; मानव पुन्हा मातीत मिळेल.


मेघ ज्याप्रमाणे वितळून नाहीसा होतो, तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही,


कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो.


तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात.


ते मेंढरांच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले आहेत; मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे; प्रभातकाल झाला म्हणजे नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करतील; त्यांचे देह अधोलोकात क्षय पावतील; त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही;


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


मानवपुत्राचा प्राण वर जातो आणि पशूचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक?


हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना?


भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील.


जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan