Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूंवर येतात; दोघांवरही एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोही मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्वकाही व्यर्थ आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जे मानवजातीस घडते तेच पशुसही घडते. जसे पशू मरतात तसे लोकही मरतात. ते सर्व एकाच हवेतून श्वास घेतात, पशुपेक्षा मानवजात वरचढ नाही. सर्वकाही केवळ व्यर्थ नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 खरोखर मानवाचे नशीब हे इतर प्राण्यांप्रमाणे आहे; सारखेच नशीब हे दोघांसाठी वाट पाहत असते: जसा एक मरतो, तसाच दुसराही मरतो. सर्वांना सारखाच श्वास आहे; इतर प्राण्यांपेक्षा मानवाला अधिक लाभ नाही. सर्वकाही व्यर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 3:19
18 Iomraidhean Croise  

आपल्या सर्वांना मरणे प्राप्त आहे; आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही; देव प्राणहरण करत नसतो तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करत असतो.


तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात.


मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही; तो नश्वर पशूंसारखा आहे.


जे अभिमानी आहेत त्यांची, व त्यांचे बोलणे ज्यांना पसंत पडते अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे. (सेला)


मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशूंसारखा आहे.


ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली; आणि पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय.


ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले, तेव्हा मला असे दिसून आले की, हाही वायफळ उद्योग होय.


ज्ञान्याचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात; आणि मूर्ख अंधकारात चालतो; असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले.


मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सदा राहणार नाही, कारण पुढे येणार्‍या दिवसांत सर्वांचे विस्मरण होणार आहे. तर पाहा, ज्ञानी कसा मरण पावतो तर मूर्खाप्रमाणेच!


भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील.


कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्‍याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्‍याची सारखीच दशा होते.


इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan