Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 असा मी थोर झालो; माझ्यापूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो तरी माझा विवेक कायम होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जे माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 2:9
8 Iomraidhean Croise  

शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता.


तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत.


म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो; मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो; तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही.


परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलादेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याही राजाला पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजऐश्वर्य त्याला दिले.


दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले.


मी आपल्या मनाशी म्हणालो, “माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे; ज्ञान व विद्या ह्यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे.”


संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो?


Lean sinn:

Sanasan


Sanasan