Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी दासदासी खरेदी केल्या; माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते; खिल्लारे व कळप ह्यांचे मोठे धन माझ्याजवळ होते, तेवढे माझ्यापूर्वी यरुशलेमेत कोणाजवळ नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी यरूशलेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अधिक गुरांचे आणि शेरडामेंढरांच्या कळपाचे मोठे धन मजजवळ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी दास व दासी खरेदी केले आणि माझ्या घरात जन्मलेले इतर दास देखील होते. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये कोणाही कडे नव्हते इतके जास्त कळप आणि गुरे माझ्या मालकीचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 2:7
16 Iomraidhean Croise  

तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता.


आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.


अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार.”


दहा पुष्ट बैल, कुरणातले वीस बैल, शंभर मेंढरे, ह्याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी.


मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे.


त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.


शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, हसोफरताचे वंशज, परूदाचे वंशज,


सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज हे सगळे मिळून तीनशे ब्याण्णव होते.


शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, सोफेरेथाचे वंशज, परिदाचे वंशज.


सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.


परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला.


परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan