Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 कारण मनुष्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्रीदेखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही. हेही वायफळच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्यांच्या सर्व दिवसांत, त्यांचे काम त्यांना दुःख आणि वेदना अशा आहेत; रात्रीच्या वेळीसुध्दा त्यांचे मन विश्रांती घेत नाही. हे सुद्धा व्यर्थच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 2:23
20 Iomraidhean Croise  

आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;


याकोब फारोला म्हणाला, “माझी जीवितयात्रा एकशे तीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोचले नाहीत.”


त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला


“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.


पण ठिणग्या वर उडतात तसा मानव कष्ट भोगण्यासाठी जन्मास येतो.


तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो.


कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. (सेला)


जेवढे दिवस तू आम्हांला पिडले, जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले त्या मानाने आम्हांला आनंदित कर.


ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत.


कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दु:खही अधिक.


मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.


कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.


तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.


मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लावले; कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.


नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली; त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत; त्याची झोप उडाली.


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan