Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही; मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही; कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे; ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले, ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही, कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे; आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 2:10
21 Iomraidhean Croise  

त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले.


तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?


निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.


तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.


जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.


हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.


मग मी आपल्या मनात म्हटले, “चल, हास्यविनोदाने मी तुला अजमावून पाहतो; तर आता तू सुख भोगून घे;” पण हेही व्यर्थ.


मनुष्य जे काही परिश्रम करतो व आपला जीव उलथापालथा करून ह्या भूतलावर खटाटोप करतो त्याचा त्याला काय लाभ?


मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.


ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, ह्यापरते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे; त्याच्यामागे जे काही होणार ते त्याने पाहावे म्हणून त्याला परत कोण आणील?


ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही; हेही व्यर्थ!


तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.


मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे : मनुष्याने खावे, प्यावे व ह्या भूतलावर जे श्रम तो करतो त्या सर्वांत देवाने त्याला दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे; कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे.


ते हे : कोणा मनुष्याला देव धन, संपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला पाहिजे ते मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही; तरी देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगतो; हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय.


मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.


त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.


देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे.


कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;


तेव्हा घरी परत येऊन आपल्या आईवडिलांकडे जाऊन तो म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे; ती मला बायको करून द्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan