Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 12:2
15 Iomraidhean Croise  

इसहाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव ह्याला बोलावून म्हटले, “बाळा”; तो म्हणाला, “काय आज्ञा?”


इस्राएलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यांना त्याच्याजवळ नेले. तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यांना आलिंगन दिले.


तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावत आहे; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत.


तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस, तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील, आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.


जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले; ती भयाने कंपित झाली, खोल जलेही खळबळली.


आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.


आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही.


त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.


सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशण्याचे थांबतात.


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


त्या वेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते,)


एली ह्या वेळी अठ्याण्णव वर्षांचा होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते.


देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला; तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो चाळीस वर्षे इस्राएलाचा शास्ता होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan