Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 याविषयाचा शेवट हाच आहे, सर्व काही ऐकल्यानंतर, तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आता सर्व ऐकून झाले; सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की: परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ, कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 12:13
27 Iomraidhean Croise  

मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.”


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल; आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशःप्राप्ती होईल.


तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’


परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.


तो आपले भय धरणार्‍यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो.


जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.


परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात.


परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही.


पातक्यांचा हेवा करू नकोस तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग;


मानवपुत्रांनी आपल्या सार्‍या आयुष्यात ह्या भूतलावर2 काय केले असता त्यांचे हित होईल ह्याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल ह्याचा मी आपल्या मनाशी शोध केला.


मला हेदेखील समजून आले की देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार; ते अधिक करता येत नाही व उणे करता येत नाही; मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवतो.


बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी होत; पण तू देवाचे भय धर.


मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्‍चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?


ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


जो आज्ञा पाळतो तो अनिष्ट पाहणार नाही; नेमलेला काळ व न्यायसमय हे ज्ञान्याच्या मनाला अवगत होतील.


हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


तर आता हे इस्राएला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी,


आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


ज्या दिवशी तू होरेबाजवळ आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की, ‘ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्याजवळ जमव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन.’


जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात.


त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्यात म्हणजे तू दीर्घायू होशील.


सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.


इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’


मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा; त्याने तुमच्यासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत ह्याचा विचार करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan