Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ज्ञान्यांची वचने पराण्यांसारखी असतात; सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे असतात; एकाच मेंढपाळांपासून ती प्राप्त झाली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 ज्ञानाची वचने आरींसारखी आहेत. शिक्षकाची त्याच्या म्हणीच्या संग्रहातील वचने खोल ठोकलेल्या खिळ्यांसारखी आहेत. ती एकाच मेंढपाळाकडून शिकविण्यात आली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 सुज्ञानाची वचने पराणीप्रमाणे आहेत, त्यांच्या शब्दांचा संग्रह एका मेंढपाळाने दिलेल्या घट्ट रोवलेल्या खिळ्यांप्रमाणे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 12:11
21 Iomraidhean Croise  

तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले; याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले.


सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर ह्याने आमच्यावर अनुग्रह केला आहे; आमच्यातले थोडके लोक वाचवून अवशेष ठेवले आहेत आणि आम्हांला त्याच्या पवित्रस्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे; आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हांला थोडेसे नवजीवन मिळाले आहे.


परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


बोधवचने व दृष्टान्त, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत; ह्यासाठी ही आहेत.


नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात.


ज्ञान्यांची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव,


शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.


मूर्खांचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे.


मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन; म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल.


मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.


परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?


त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.


परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?


मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो.


येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय?


हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”


कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.


आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’


कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.


मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला गौरवाचा न कोमेजणारा हार2 प्राप्त होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan