Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी, आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील, त्यामध्ये मला काही सुख नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल, “मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”—

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 12:1
40 Iomraidhean Croise  

परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे.


त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी.


आज मी ऐंशी वर्षांचा आहे; ह्या वयात मला बर्‍यावाइटाचा भेद काय समजणार? आपला दास जे काही खातोपितो त्याची चव त्याला कळते काय! गाणार्‍यांचा व गाणारणींचा शब्द मला ऐकू येतो काय? तर आपल्या दासाने माझ्या स्वामीराजांना भार का व्हावे?


आपला दास महाराजांबरोबर फक्त यार्देनेपार येत आहे; महाराजांनी ह्याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा?


सर्व इस्राएल त्याच्यासाठी शोक करून त्याला पुरतील; यराबामाच्या घराण्यात त्यालाच काय ती मूठमाती मिळेल, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासंबंधाने यराबामाच्या घराण्यात त्याच्याच ठायी काहीसा चांगुलपणा दिसून आला आहे.


मी आपल्याकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जाईल; आणि मी जाऊन अहाबाला हे वर्तमान सांगितले व आपण त्याला आढळला नाहीत तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिऊन वागत आलो आहे.


ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”


ज्यांचे वीर्य नष्ट झाले आहे, त्यांच्या बाहुबलाचा मला काय उपयोग?


हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे.


मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन.


मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.


आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.


मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.


माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते.


ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.


तू सातआठ जणांस वाटा दे; कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही.


मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!


हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवास लागून राहिली आहे.


मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.


ह्या चौघां तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यांत निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टान्त व स्वप्ने ह्यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला.


परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही; त्याचे केस मधूनमधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही.


कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो ‘द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही’; आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.


येशूने तर बालकांना आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका; कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.


पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे.


त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.


तसेच मीही ह्या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वराला आमरण दिला आहे.” तेव्हा एलकानाने तेथे परमेश्वराची आराधना केली.


पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”


शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे.


इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan