Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो, पण तो येण्याऱ्या अंधकाराच्या दिवसाचा विचार करो, कारण ते पुष्कळ होतील. जे सर्व येते ते व्यर्थच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 एखादा मनुष्य कितीही दीर्घायुष्य जगो, त्या सर्वांचा त्याने आनंद घ्यावा. परंतु त्यांनी अंधकाराचे दिवस आठवावे, कारण ते पुष्कळ असतील. येणारे सर्वकाही व्यर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 11:8
32 Iomraidhean Croise  

मग जेथून परत येणे नाही अशा अंधाराच्या, मृत्यूच्या प्रदेशात मी जाईन;


जेथे काळोख, निबिड अंधकार आहे, अशा मृत्युच्छायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन; तेथला प्रकाश अंधकारच होय.”


पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो; मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे असतो?


तसा मनुष्य पडला म्हणजे तो पुन्हा उठत नाही; आकाशाचा विलय होईतोवर तो जागृत होणार नाही; आणि त्याला झोपेतून कोणी जागे करणार नाही.


अन्नान्न करीत तो चोहोकडे भटकतो. अंधकारमय दिवस आपल्यासमीप आहे हे त्याला ठाऊक आहे;


ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटतील, त्याला जगातून पळवतील.


मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशूंसारखा आहे.


तू सातआठ जणांस वाटा दे; कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही.


मग मी आपल्या मनात म्हटले, “मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला?” मी आपल्या मनात म्हटले हेही व्यर्थच!


ह्यावरून जीविताचा मला वीट आला; कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुचित वाटले; एकूण सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे.


तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादले आहे त्यावर तो ताबा चालवणार; हेही व्यर्थच!


जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान व सुख देतो; धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतो, अशासाठी की, देवाच्या दृष्टीने जो चांगला त्याला ते द्यावे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते; तरी पुढील काळातील लोक त्याच्याविषयी आनंद पावणार नाहीत. निःसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


व्यर्थतेची वृद्धी करणार्‍या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ?


हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना?


संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.


जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.


तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.


ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!


ते तुम्हांला असे सांगत असत की, “शेवटल्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan