Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 वार्‍याची1 गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही; तसेच सर्वकाही घडवणार्‍या देवाची कृती तुला कळत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही, आईच्या गर्भात बाळाची हाडे कशी वाढतात हेही जसे तुला कळत नाही तसेच सर्व काही निर्माण करणाऱ्या देवाच्या कार्याचे आकलन तुला करता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जसे वार्‍याचे मार्ग, किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही, तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 11:5
19 Iomraidhean Croise  

सर्वसमर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे; तो न्याय व महान नीतिमत्ता विपरीत करीत नाही;


मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग.


तो अतर्क्य महत्कृत्ये करतो; तो अगणित अद्भुत कृत्ये करतो;


हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केलीस; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही;1 मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.


हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत


ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत.


वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो; तो एकसारखा घुमत जाऊन पुनःपुन्हा आपली फेरी करतो.


जो वारा पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो, तो कापणी करणार नाही.


मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत.


आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.


जे आहे ते दूर व अत्यंत गूढ आहे; त्याचा थांग कोणाला लागणार?


मग मी देवाच्या सर्व कार्याकडे लक्ष दिले, तेव्हा असे दिसून आले की भूतलावर जे काही कार्य चालले आहे ते मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागायचा नाही.


तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे.


वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”


अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


Lean sinn:

Sanasan


Sanasan