Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू सातआठ जणांस वाटा दे; कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू सात आठ लोकांस वाटा दे. कारण पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हास कल्पना नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर; कारण पृथ्वीवर कोणती दुर्घटना घडेल, हे तुला ठाऊक नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 11:2
22 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


ह्याकरता खेडेगावचे यहूदी जे गावकूस नसलेल्या गावांत राहतात ते अदार महिन्याची चतुर्दशी आनंदोत्सवाचा मंगलदिन व एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्याचा दिवस ठरवून पाळतात.


ह्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा प्राप्त झाला, ह्या महिन्यात दु:ख जाऊन आनंद झाला, आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा; हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबांना दानधर्म करण्यात घालवावेत.


तो तुला सहा संकटांतून सोडवील; सातांनी तुला काही अपाय होणार नाही.


त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2


जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.


परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे :


मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते स्वतःला पृथ्वीवर रिचवतात; झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार.


मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!


आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील.


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


हा पुरुष आम्हांला शांती होईल; जेव्हा अश्शूरी आमच्या देशात येऊन आमचे महाल तुडवील, तेव्हा त्याच्याविरुद्ध आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू.


येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.


जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.


त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्‍चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.”


बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.


वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.


बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहोत म्हणून पीडितांची आठवण ठेवा.


आपल्या चाकरांना विचारा म्हणजे ते आपणाला सांगतील; तर ह्या तरुण पुरुषांवर कृपादृष्टी करा; आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना व आपला पुत्र दावीद ह्याला द्या.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan