Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 11:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यास्तव आपल्या मनातून राग दूर कर, आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको. कारण तारुण्य व सामर्थ्य ही व्यर्थ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर आणि आपल्या देहातील वाईट गोष्टी काढून टाक, कारण तारुण्य आणि जोश निरर्थक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 11:10
14 Iomraidhean Croise  

रानगाढवाचा मनुष्य बनेल तर अक्कलशून्य मनुष्याला समज प्राप्त होईल.


तू माझ्या नावावर कठीण शिक्षा लिहितोस, माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगायला लावतोस.


त्याच्या हाडांत तारुण्याचा जोम भरला आहे; पण तो त्याच्याबरोबर मातीस मिळेल.


हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.


पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. (सेला)


खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.


बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते.


ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली; आणि पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय.


व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो; व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ.


आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील.


तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2


तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.


Lean sinn:

Sanasan


Sanasan