Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 10:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नकोस; आपल्या निजायच्या खोलीतसुद्धा श्रीमंताना शिव्याशाप देऊ नकोस; कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल; पक्षी तुझी गोष्ट प्रकट करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको. आणि श्रीमंताला आपल्या झोपण्याच्या खोलीतही शाप देऊ नको. कारण आकाशातले पाखरू तुझे शब्द घेऊन जाईल, आणि जे काही पक्षी आहेत ते गोष्टी पसरवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 राजाला आपल्या मनात देखील शाप देऊ नको, श्रीमंताला सुद्धा आपल्या शयनकक्षातून शाप देऊ नकोस, कारण आकाशातील एक पक्षी तुझे शब्द घेऊन जाईल, आणि आपल्या पंखाने उडत जाऊन तू काय बोललास याचा अहवाल देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 10:20
11 Iomraidhean Croise  

त्याच्या एका सेवकाने त्याला सांगितले, “माझे स्वामीराज, असा कोणी नाही; पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्राएलातला संदेष्टा अलीशा हा इस्राएलाच्या राजाला कळवतो.”


मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीला ती सांगितली, आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजाला ती सांगितली.


कारण त्याच्याजवळ ते एकच पांघरूण असून त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार; ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने माझ्याकडे गार्‍हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.


तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.


नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकरनोकरांच्या घरांत, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यांत आणि काथवटींत बेडूकच बेडूक होतील;


ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील; आणि असे होईल की त्यांना भूक लागली म्हणजे ते संतापून आपल्या राजाला व आपल्या देवाला शिव्याशाप देतील; मग आपली तोंडे ते वर करतील;


तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.”


त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप


पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्‍याविरुद्ध वाईट बोलू नकोस’ असे शास्त्रात लिहिले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan