Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 लोक हसण्याकरता मेजवाणी तयार करतात, द्राक्षरस जीवन आनंदीत करतो. आणि पैसा प्रत्येकगोष्टीची गरज पुरवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 10:19
33 Iomraidhean Croise  

मग योसेफापुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढली, पण बन्यामिनाला इतरांच्या पाचपट वाढले, आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले.


अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की, “सावध राहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हांला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा, काही भिऊ नका; मी तुम्हांला हुकूम करतो आहे ना? हिंमत धरा, शौर्य दाखवा.”


दावीद राजा अर्णानाला म्हणाला, “नाही, नाही, मी पुरे मोल देऊन ह्या वस्तू घेईन; कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही; फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”


त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू व मोलवान वस्तू देऊन त्यांना साहाय्य केले; ह्यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.


मी त्यांना म्हटले की, “जे आपले यहूदी भाऊबंद परराष्ट्रांस विकले गेले होते त्यांची आम्ही शक्तिनुसार सोडवणूक केली; पण तुम्ही आपल्या भाऊबंदांची विक्री चालवली आहे काय? त्यांना तुम्ही आम्हांला विकणार काय?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले; त्यांनी चकार शब्दही काढला नाही.


सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिग्था, अवगथा, जेरथ, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांना आज्ञा केली की,


म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी.


त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2


मानवपुत्रांनी आपल्या सार्‍या आयुष्यात ह्या भूतलावर2 काय केले असता त्यांचे हित होईल ह्याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल ह्याचा मी आपल्या मनाशी शोध केला.


जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.


तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल; ती भांडारात ठेवणार नाहीत; तिचा संचय करणार नाहीत; तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात त्यांना भरपूर खाण्यास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावीत म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल.


बाहेर रस्त्यात द्राक्षारसास्तव ओरड चालली आहे, सर्व उत्सव मावळला आहे, पृथ्वीचा हर्ष लोपला आहे;


तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि आधी वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”


येशू त्याला म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”


मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’


आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांला सार्वकालिक वस्तीत घ्यावे.


आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.


तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्‍चय केला की, यहूदीयात राहणार्‍या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे;


ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत.


कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.


मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला; तेथे शमशोनाने मेजवानी दिली. त्या काळच्या तरुणांमध्ये तशी प्रथा होती.


द्राक्षवेल म्हणाली, ‘देवांना व मानवांना संतुष्ट करणारा माझा रस देण्याचे सोडून मी झाडांसमोर हालतडोलत राहू काय?’


मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan