Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 लोखंडी हत्यार बोथटले व त्यास धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगाचे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जर कुर्‍हाड बोथट असली, आणि तिची धार तीक्ष्ण नसेल, तर श्रम अधिक लागते, परंतु निपुणता यश आणेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 10:10
20 Iomraidhean Croise  

ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्‍यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?”


कालप्रवृत्ती ओळखून इस्राएलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील दोनशे नायक आले; त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.


सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकांचा काही उपयोग नाही.


मूर्ख श्रम करून करून थकतो पण त्याला शहराची वाटदेखील उमगत नसते.


धोंडे फोडणार्‍याला त्यांपासून इजा होते; लाकडे तोडणारा त्यांमुळे धोक्यात येतो.


मग माझ्या नजरेस आले की अंधकारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ.


युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे.


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


मी आपली चमकणारी तलवार पाजळली, मी न्याय हाती घेतला, तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन, माझ्या वैर्‍यांचे उसने फेडीन.


बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या.


जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan