Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जसे मरण पावलेल्या माशा गंध्याचे सुगंधी तेल दुर्गंधीत करतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 10:1
11 Iomraidhean Croise  

तेव्हा हनानी द्रष्ट्याचा पुत्र येहू हा यहोशाफाट राजाला सामोरा जाऊन म्हणाला, “तू दुष्टांचे साहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यावर प्रीती करावी काय? ह्यामुळे परमेश्वराचा तुझ्यावर कोप भडकला आहे.


इस्राएलाचा राजा शलमोन अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला होता ना? पुष्कळ राष्ट्रांत त्याच्यासारखा कोणी राजा झाला नाही; तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्राएलावर राजा केले होते, तरी त्यालाही अन्य जातींच्या स्त्रियांनी पापात पाडले.


मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते.


ती समुद्राच्या वाळूपेक्षा जड भरेल! म्हणूनच माझे बोलणे मर्यादेबाहेर गेले आहे.


त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर; हे अभिषेकाचे पवित्र तेल होय.


युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.


‘कोणी समर्पित मांस आपल्या वस्त्राच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला, कालवणाला, द्राक्षारसाला, तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला, तर ते पवित्र होईल काय?”’ तेव्हा याजकांनी “नाही” असे उत्तर दिले.


मग हाग्गय म्हणाला, “प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला ह्यांपैकी कशासही शिवला, तर ते अशुद्ध होईल ना?” तेव्हा याजकांनी “होईल” असे उत्तर दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan