Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 एकदा होऊन गेले तेच होणार; करण्यात आले तेच करण्यात येणार; भूतलावर नवे म्हणून काहीच नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जे काही आहे तेच होणार, आणि जे केले आहे तेच केले जाईल. भूतलावर काहीच नवे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जे घडले ते पुन्हा एकदा होणार, जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल; सूर्याखाली नवे असे काही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:9
10 Iomraidhean Croise  

“हे पाहा, काही नवीन आहे,” असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते.


मग पाहा, ज्ञान, वेडेपण व मूर्खपण ह्यांकडे मी लक्ष पुरवले; कारण राजाच्या मागून येणार्‍या पुरुषाच्या हातून काय होणार? आजवर लोक जे करीत आले तेच तो करणार.


जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे; आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे; आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्यापुढे आणतो.


जे काही झाले आहे त्याला पूर्वीच नाव दिले होते; मनुष्याचे काय होणार हेही पूर्वीच माहीत असते; त्याच्याहून जो समर्थ त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही.


“ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.


पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.


हे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.”


तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.


तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan