Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सर्वकाही कष्टमय आहे; कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही; ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सर्व गोष्टी कष्टमय आहेत. आणि कोणीही त्याचे स्पष्टीकरण करू शकत नाही. डोळे जे काय पाहतात त्याने त्यांचे समाधान होत नाही, किंवा जे काय कानाने ऐकतो त्यानेही त्यांची पूर्तता होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 सर्वकाही त्रासाने भरलेले आहे, जे कोणाला शब्दात सांगता येत नाही. नेत्र बघून कधी समाधानी होत नाहीत. कान सुद्धा ऐकून भरत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:8
16 Iomraidhean Croise  

मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल; आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.


अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.


सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनःपुन्हा वाहत राहतात.


मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.


जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान व सुख देतो; धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतो, अशासाठी की, देवाच्या दृष्टीने जो चांगला त्याला ते द्यावे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


मनुष्याचे सर्व परिश्रम पोटासाठी आहेत, तरी त्याच्या जिवाची तृप्ती म्हणून होत नाही.


तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले; जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली; हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात.


अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan