Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो; व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 शिक्षक हे म्हणतो, धुक्याच्या वाफेसारखी, वाऱ्यातील झुळूकेसारखी प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!” उपदेशक म्हणतो. “निव्वळ व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:2
23 Iomraidhean Croise  

रानगाढवाचा मनुष्य बनेल तर अक्कलशून्य मनुष्याला समज प्राप्त होईल.


मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे.


माझे आयुष्य किती अल्प आहे ह्याची आठवण कर; तू सर्व मानवजात निर्माण केलीस ती व्यर्थच काय?


ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.


मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!


व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक3 म्हणतो, सर्वकाही व्यर्थ!


मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.


मग मी आपल्या मनात म्हटले, “मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला?” मी आपल्या मनात म्हटले हेही व्यर्थच!


ह्यावरून जीविताचा मला वीट आला; कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुचित वाटले; एकूण सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे.


तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादले आहे त्यावर तो ताबा चालवणार; हेही व्यर्थच!


कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई ह्यांनी परिश्रम करून काही संपादावे, आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे; हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय.


त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच!


जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान व सुख देतो; धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतो, अशासाठी की, देवाच्या दृष्टीने जो चांगला त्याला ते द्यावे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणार्‍या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानवपुत्रांना रंजवणार्‍या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या.


मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूंवर येतात; दोघांवरही एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोही मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्वकाही व्यर्थ आहे!


ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते; तरी पुढील काळातील लोक त्याच्याविषयी आनंद पावणार नाहीत. निःसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही; हेही व्यर्थ!


व्यर्थतेची वृद्धी करणार्‍या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ?


कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणार्‍यामुळे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan