Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले, तेव्हा मला असे दिसून आले की, हाही वायफळ उद्योग होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 याकरिता ज्ञान समजायला आणि वेडेपण व मूर्खपण जाणायला मी आपले मन लावले, मग हेही वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्‍याचा पाठलाग केल्यासारखे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:17
14 Iomraidhean Croise  

ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली;


व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक3 म्हणतो, सर्वकाही व्यर्थ!


ह्यावरून जीविताचा मला वीट आला; कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुचित वाटले; एकूण सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे.


मानवपुत्रांनी आपल्या सार्‍या आयुष्यात ह्या भूतलावर2 काय केले असता त्यांचे हित होईल ह्याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल ह्याचा मी आपल्या मनाशी शोध केला.


मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूंवर येतात; दोघांवरही एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोही मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्वकाही व्यर्थ आहे!


मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.


मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लावले; कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.


भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात.


सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan