Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मी आपल्या मनाशी म्हणालो, “माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे; ज्ञान व विद्या ह्यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरूशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:16
20 Iomraidhean Croise  

तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत.


शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.


माझे चाकर ती लाकडे लबानोनाहून समुद्रापर्यंत नेतील; तेथे त्याचे तराफे करून जे ठिकाण आपण मला नेमून द्याल तेथे जलमार्गाने ती मी पोचती करीन; तेथे ती मी सोडवून ठेवीन; मग तेथून ती आपण घेऊन जा; माझ्या घरच्या सेवकांना अन्नसामग्री पुरवली म्हणजे पुरे.”


इकडे देवाचा माणूस अलीशा ह्याचा चाकर गेहजी ह्याने विचार केला की, “अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली; परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्यामागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच.”


हूरामाने आणखी असे लिहिले की, “आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता, इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य; परमेश्वराप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या आणि राजमंदिर बांधण्याच्या कार्यासाठी त्याने दावीद राजाला बुद्धिसंपन्न आणि चातुर्य व अक्कल ह्यांनी मंडित असा पुत्र दिला आहे.


त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला)


रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करतो; माझा जीव विचारात पडला आहे की,


मग मी आपल्या मनात म्हटले, “चल, हास्यविनोदाने मी तुला अजमावून पाहतो; तर आता तू सुख भोगून घे;” पण हेही व्यर्थ.


मग मी आपल्या मनात म्हटले, “मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला?” मी आपल्या मनात म्हटले हेही व्यर्थच!


असा मी थोर झालो; माझ्यापूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो तरी माझा विवेक कायम होता.


मी आपल्या मनात म्हटले, देव नीतिमानाचा आणि दुष्टाचा न्याय करील; कारण हरएक गोष्टीचा व हरएक कामाचा नेमलेला समय आहे.


तो म्हणतो, ‘मी आपल्यासाठी विस्तीर्ण घर व लांबरुंद माड्या बांधीन.’ तो त्याला बहुत खिडक्या पाडतो; त्याने घरास गंधसरूची तक्तपोशी केली आहे, हिंगुळाचा रंग दिला आहे.


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan