Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तू त्यांचा देश वतन करून घ्यायला जात आहेस हे तुझ्या पुण्याईमुळे नव्हे अथवा तुझ्या मनाच्या सात्त्विकतेमुळे नव्हे, तर त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे; तसेच तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना परमेश्वराने दिलेले वचन खरे करावे म्हणून तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 9:5
26 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन.


तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.


तो त्याला म्हणाला, “तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्द्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.”


ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.”


ह्या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्या वेळी देवाने अब्राहामाची आठवण केली, आणि लोट राहत होता तेथल्या नगरांचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचवले.


मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील;


आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;


तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’


तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नामासाठी मी अशी कृती केली.


ह्याकरता इस्राएल घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, मी हे तुमच्याकरता करत नाही, तर तुम्ही राष्ट्राराष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून माझ्या नामाप्रीत्यर्थ मी हे करत आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मी तुमच्याकरता करीत नाही हे तुम्हांला ठाऊक असू द्या; हे इस्राएल घराण्या, तुम्ही आपल्या आचाराविषयी लज्जित व फजीत व्हा.


असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरून घालवणार आहे, ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत.


त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे.1


प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्राहामाबरोबर वात्सल्याने वर्तशील.


तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात.


सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत.


कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”


पाहा, हा देश मी तुमच्यापुढे ठेवला आहे, म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना व त्यांच्यामागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात जाऊन तो वतन करून घ्या.’


आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नकोस; कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलामुलींचादेखील होम करीत असतात.


कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.


तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करायला शिकू नकोस.


न केल्यास ते आपापल्या देवांची पूजा करताना जी अमंगल कृत्ये करतात त्यांसारखी करायला ते तुम्हांला शिकवतील आणि तेणेकडून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध तुम्ही पाप कराल.


तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan