Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




अनुवाद 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तर आता हे पक्के लक्षात ठेव की, भस्म करणार्‍या अग्नीसारखा तुझ्यापुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वर आहे; तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील, आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालवून देऊन त्यांचा त्वरित नाश करशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पण तुमची खात्री असू द्या की, याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणार्‍या अग्निरुपाने तुमच्यापुढे जातील. ते त्यांचा नाश करतील; त्यांना तुमच्यापुढे नमवतील आणि तुमच्यासमोर त्यांचा नायनाट करतील, मग याहवेहने दिलेल्या अभिवचनानुसार तुम्ही त्यांना लगेच संपूर्ण नष्ट कराल आणि त्यांना तिथून घालवून द्याल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




अनुवाद 9:3
34 Iomraidhean Croise  

जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन,


पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणार्‍या अग्नीसारखे इस्राएल लोकांना दिसत होते.


माझ्या ठायी राग कसला तो नाहीच; माझ्यापुढे युद्धात काटे व काटेरी झुडपे असती तर ती मी पायाखाली तुडवून सर्व जाळून टाकली असती;


पाहा, परमेश्वराचे नाम दुरून येत आहे, त्याचा क्रोध भडकला आहे, धुराचा लोट चढत आहे; त्याचे ओठ क्रोधाने स्फुरत आहेत, त्याची जिव्हा भस्म करणार्‍या अग्नीसारखी आहे;


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


सीयोनेतील पातकी घाबरले आहेत. अधर्म्यांना कापरे भरले आहे. “भस्म करणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण राहील? सर्वकाळ पेटत राहणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण टिकेल?”


तोडफोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे; ते वेस फोडून वेशीतून पार निघून गेले; त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे.


तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या :


तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या;


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.


तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे, त्याने मिसर देशात तुमच्यादेखत जे जे केले, ते ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल;


तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.


कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे; तो ईर्ष्यावान देव आहे.


जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.


तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून हळूहळू घालवील; त्यांचा एकदम संहार करू नकोस, केलास तर वनपशू फार होऊन ते तुला उपद्रव देतील.


म्हणून हे पक्के लक्षात ठेव की, तुझ्या पुण्याईमुळे हा उत्तम देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे असे नाही; कारण तू ताठ मानेचे राष्ट्र आहेस.


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजांसह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.


परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्‍यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.


तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.”


अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे.


लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेर्‍यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले;


दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून उतरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan